About Us

आपल्या हिंदु धर्मातील सोळा मुख्य संस्कारातील व परिवर्तनवादी संस्कार अर्थात विवाह संस्कार धर्म, पूजा, संपत्ती, प्रतिष्ठा या तीन पुरुषार्थ प्राप्तीसतव केला जाणार पूर्ण संस्कार म्हणजे विवाह संस्कार, दोन मनांचे व कुटूंबांचे मनोमिलन, दैवीशक्तीच्या इच्छेने, समाजाच्या स्वीकृतीने, जेष्ठाच्या आशीर्वादाने व कानिष्ठांच्या सहभागातून कौटुंबिक आयुष्यात आनंद फुलविणारा क्षण म्हणजे विवाह, हि प्रक्रिया दोन भिन्न मनांना, कुटूंबाना आयुष्यभरासाठी एक प्रेमळ नात्याच्या बंधनात जोडणारी सामाजिक चळवळ आहे. या चळवळीतील प्रमुख घटक म्हणजे कुटूंब व्यवस्थेतील माणसांच्या गोतावळ्यात जगणारी जेष्ठ आणि नातेसंबध जपणारी मनमोकळी माणसं...! मात्र आजच्या धावपळीच्या काळात अशी माणसे कमी होत आहेत. एक बाजूने एकत्र कुटूंब व्यवस्था संपुष्टात जात असताना माणसांचा, कौटूंबीक जनसंपर्क कमी होत चाललाय. त्यामुळे विवाह या संस्कारातील आणि सामाजिक चळवळीतील अंतर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारण फक्त संपर्काचा आभाव नाही तर सध्या परिस्थितीत प्रत्येकाच्या आयुष्यात वाढत चाललेली दैनंदिन जबाबदारी आणि कमी होत चाललेली मुबलक व अचूक माहितीचे स्त्रोत हेहि आहे.

मागील दोन दशकांपासून एकीकडे माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे तर दुसरीकडे माणसांचा माणसांशी कौटुंबिक सहसंबंध दुरावत चालला आहे.

विवाह कार्याविषयी अनेक जाती, पंथ आणि समाजांच्या चळवळी सुरु असतांना देखील पालकाच्या आयुष्यात मुला- मुलींच्या विवाह संबंधित वाढत चाललेल्या सामस्यांवर प्रभावी उपाय म्हणून आम्ही “उज्वलबंधन वधू-वर सूचक केंद्र” शिर्डी (साकुरी) या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आणि २३ ते २४ वर्षाच्या अनुभवानंतर आपल्यासमोर ऑनलाइन सेवा (वेबसाईट) संस्थेने सुरु केली असून नवीन पिढीला सहज व सुलभ आपल्या जीवनसाथीचा शोध घेता यावा या हेतूनेच या उपक्रमाची सुरुवात केली असून. अतिशय अल्पवेळेत पालकांना योग्य वधू-वर संबंधित अचूक माहिती या वेबसाईटद्वारे व कार्यालयीन जनसंपर्काद्वारे मिळत आहे.

माणसे जोडणारी आणि नाते फुलविणारी अग्रगण्य संथा म्हणून “उज्वलबंधन” या संस्थेची आज नगर जिल्याच नव्हे  तर राज्याच्या विविध भागात व परप्रांतात ओळख झाली आहे. पालकांचा संस्थेवरील विश्वास व त्याचे हेतुपुरस्करपणे त्यांना दिलेल्या सहकार्यातून आम्ही हे यश संपादन करू शकलो. संस्थेत ९६ कुळी मराठयांपासून विविध जाती, पंथ आणि पोटजातीतील वधु वरांची मोठ्या संख्येने नावनोंदणी झालेली असून आपल्या कुटुंबाच्या नवीन नातेसंबधाची व आपल्या पाल्याच्या योग्य जोडीदाराचा शोध घेऊन नातेसंबंध प्रस्थापित व्हावेत व आपल्या आयुष्यात नक्कीच आनंद फुलाव या आपेक्षेसह आपण आमच्या संस्थेवर विश्वास दर्शविल्याबद्दल आपल्या कुटुंबाच्या “उज्वलबंधनाची” सुवर्णसंधी आम्हाला दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने पालकाचे मन:पूर्वक आभार...!

आपण आमच्या www.ujjwalbandhan.com या संकेतस्थळाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.

आपली स्नेहांकित

 सौ. उज्ज्वलाताई शिंदे
 उज्वल बंधन वधू वर सूचक केंद्र शिर्डी (साकुरी)

new member
new member
new member